आज अंगारिका चतुर्थी. सकाळी ऑफिसला येताना सिद्धिविनायकला खुप गर्दी होती. भक्तांची लाइन तीन ते चार कि.मी. तरी लांब होती. भक्तांची एवढी गर्दी बघून माझे ही हात आपोआप जोडले गेले. गणपती बाप्पाला आधी वंदन केले आणि मग त्या रंगेतल्या भक्तांना! पूर्ण श्रद्धेने ते देवाच्या पायाशी आले होते. प्रत्येक जण कमीत कमी पाच ते सहा तास उन्हात रांगेत थांबल्यावरच दर्शन मिळणार होते, तरीही कुणाच्याही कपाळावर आठी नव्हती.
अंगारिका चतुर्थीची गोष्ट पण अशाच एक भक्ताची आहे. त्या गोष्टीचा विडियो खाली एम्बेड करत आहे. विडियो ५० मिनिटांचा आहे, पण जर वेळ असेल तर नक्की बघा. खरच खुप छान गोष्ट आहे!
No comments:
Post a Comment